गोपनीयता धोरण
कृपया सुरुवात करण्यापूर्वी खालील गोपनीयता धोरण काळजीपूर्वक वाचा..
स्नेहसखा.कॉम हे तुमचा योग्य जोडीदार (वधू किंवा वर) शोधण्यासाठी एक ऑनलाइन वेब पोर्टल आहे. आम्ही मॅचमेकिंग सेवा आणि समुदायामध्ये जुळणाऱ्या स्थळाच्या उपलब्धतेची कोणतीही हमी किंवा खात्री देत नाही. सर्व हक्क हे आमच्याकडे राखीव आहेत. स्नेहसखा.कॉम वरील सर्व माहिती आणि सामग्री ही स्नेहसखा च्या मालकीची आणि नियंत्रित आहे. कोणत्याही प्रकारचा गैरवापर, पुनरुत्पादन, सामग्रीचे प्रकाशन किंवा कॉपी करणे किंवा स्नेहसखा.कॉम वर असलेल्या माहितीचा व्यावसायिक वापर स्नेहसखा च्या स्पष्ट संमतीशिवाय प्रतिबंधित आहे.
वैयक्तिक माहिती गोळा करण्याबाबत:
ऑनलाइन वैवाहिक वेब पोर्टल असल्याने, आम्हाला नोंदणीच्या वेळी आमच्या वापरकर्त्याकडून काही माहिती गोळा करावी लागते, जी आवश्यक आहे, आम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे जुळणारी स्थळे शोधून ती तुमच्या समोर प्रदान करण्यात सक्षम करण्यासाठी आम्ही तुमचे संपूर्ण नाव, लिंग, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, इतर वैयक्तिक तपशील, वैवाहिक स्थिती, तुमची आवड, धर्म, जात, शैक्षणिक पात्रता, रोजगार तपशील, फोटो, तुमचा सर्व्हर, IP पत्ता यासारखी माहिती गोळा करतो.
गुगल द्वारे डेटा गोळा करणे आणि त्याचा वापर:
स्नेहसखा.कॉम गुगल जाहिराती चालवते आणि त्यासाठी आम्ही कुकीज वापरतो, ते वापरकर्त्यांच्या ऑनलाइन क्रियाकलापांचा मागोवा घेते आणि वापरते ज्याच्या आधारावर ती जाहिराती देते.
स्नेहसखा सोडून इतर कोणाला आमच्या पोर्टल वरील माहिती देण्यासंबंधात माहिती:
आम्ही तुमची माहिती फक्त आमच्या सशुल्क नोंदणीकृत सदस्यांना, वेबसाइट डेव्हलपर, सुरक्षा सल्लागार आणि आमच्या कर्मचाऱ्यांना देतो. जे आमच्या वेबसाइटचे संरक्षण करण्यासाठी, तिचा प्रचार आणि ब्रँड बिल्डिंगमध्ये योगदान देतात. कायद्याने आवश्यक असल्याशिवाय आम्ही तुमची खाजगी माहिती इतर कोणासोबत ही वाटत नाही किंवा कोणालाही (कोणतीही व्यक्ती/संस्था किंवा कोणताही दुसरा पक्ष/व्यक्ती) उघडपणे, व्यावसायिक दृष्ट्या, भाड्याने किंवा विकत देत नाही.
सूचना:
कृपया आमचे अद्ययावत गोपनीयता धोरण वेळोवेळी तपासा
तुम्हाला काही शंका असल्यास, आम्हाला info@snehsakha.com वर संपर्क साधा
परतावा धोरण:
एकदा सदस्यत्व शुल्क भरल्यावर कोणत्याही कारणाने सदस्यत्वता रद्द झाल्यास शुल्क परत केले जाणार नाही तसेच कोणतेही रद्दीकरण लागू होणार नाही.